चंद्रपूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावर आलेवाही-सिंदेवाही दरम्यान मालगाडीची धडक बसल्याने १३ वर्षीय नर वाघ 'बिट्टू'चा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मृत वाघाचे कारगटा बीट परिसरात वास्तव होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना मालगाडीची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव