येवला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
- मी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्यंत जाऊ शकत नाही फार झाले तर माझी उडी ही दिल्लीपर्यंत आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचा निर्णय आता कोण घेतं हे मला माहित नाही, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावरती होते कार्यक्रमाला जाण्यापूर्वी कार्यालयामध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी नाशिकच्या पालकमंत्री पदाविषयी अगदी दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जो उल्लेख केला होता त्याचा धागा पकडून सांगितले की डोनाल्ड ट्रम्प हे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय घेणार असतील तर मी काही बोलू शकत नाही माझी उडी ही खूप झाली तर उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याही पुढे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मी चर्चा करू शकतो त्यातून काही मार्ग निघू शकेल मी एवढ्या लांब जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करू शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले त्यांच्या बोलण्याचा ओघ हा नाशिकच्या पालकमंत्री पदावरून दिवसेंदिवस वाढत असलेल्या संघर्ष आणि मतभेद यावर होता पण दादा भुसे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरती त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या कबूतर खान्यावर देखील छगन भुजबळ म्हणाले की मला असं वाटतं आता येवल्यामध्ये चिमणी पार्क सुरू करावे कारण वेगवेगळ्या पक्षांचे प्राण्यांचे पार्क सुरू झाले म्हणजे नागरिकांनाही आनंद होतो आणि वेगळ्या राजकीय पक्षाची निर्मिती तरी होते त्यामुळे यावर आता विचार करावा लागेल असा मिश्किल टोला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV