अमरावती फडणवीसांच्या हस्ते दोन लाख कुटुंबांना किराणा व साडी-चुडी वाटपाचा शुभारंभ
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) आज, सोमवारी अमरावती दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ लाख कुटुंबांना किराणा वाटप आणि भगिनींना साडी-चुडी वाटप उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम आ. रवी रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन लाख कुटुंबांना किराणा व साडी-चुडी वाटपाचा भव्य शुभारंभ


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

आज, सोमवारी अमरावती दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २ लाख कुटुंबांना किराणा वाटप आणि भगिनींना साडी-चुडी वाटप उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.

हा उपक्रम आ. रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून, युवा स्वाभिमान पार्टी व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.दिवाळीच्या सणानिमित्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब व कष्टकरी जनतेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून, राज्यातील गावागावांत व शहरांतील प्रत्येक कुटुंबाच्या घरी हा किराणा पोहोचविण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी या वाटपाची सुरुवातही झाली आहे.

कार्यक्रमास अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे, युवा स्वाभिमान पार्टीचे मार्गदर्शक सुनीलभाऊ राणा, तसेच भाजपा व युवा स्वाभिमान पार्टीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande