पुण्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव
पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा
पुण्यात ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव


पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे या कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात येणार आहे. ‘विकसित भारत @ 2047’ या पार्श्वभूमीवर हा महोत्सव दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज, कॅम्प, पुणे येथे पार पडणार आहे.

या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र आणि बक्षीस रक्कम देण्यात येईल. तसेच प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यांना विभागीय आणि राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धकांसाठी वयोगट १५ ते २९ वर्षे असा निश्चित करण्यात आला असून वयाची गणना 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. नावनोंदणी करताना आधार कार्ड आणि जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे; शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार नाही.

इच्छुक स्पर्धकांनी आपले प्रवेश अर्ज व आवश्यक कागदपत्रे दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत dsopune6@gmail.com ई-मेल अथवा व्हॉटस् अपद्वारे अश्विनी हत्तरगे, क्रीडा अधिकारी – 7387880427, ताहेर आसी – 9145402115, आशद शेख – 8484803529 सादर करावेत. सर्व स्पर्धकांनी ‘माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी करणे अनिवार्य आहे.

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कला अकादमी व संस्था येथील इच्छुक कलावंतांनी या महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन , जिल्हा क्रीडा अधिकारी, जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande