बीड -स्व.ॲड.अण्णासाहेब लोमटे दिवंगत स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचे वितरण
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)अंबाजोगाई शहरात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान म्हणून तात्या आभई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षापासून जेष्ठ विधीज्ञ दिवंगत ॲड.अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारां
अ


बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)अंबाजोगाई शहरात वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कार्याचा गौरव आणि सन्मान म्हणून तात्या आभई प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षापासून जेष्ठ विधीज्ञ दिवंगत ॲड.अण्णासाहेब लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्कारांचे वितरण दरवर्षी करण्यात येते यावर्ष स्व.विलासराव देशमुख नगरपरिषद सभागृह, अंबाजोगाई या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे होते तर उद्घाटक म्हणून अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बीड जिल्ह्याचे खा.बजरंगबप्पा सोनवणे, माजी आ.पृथ्वीराज साठे, बीड जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे,ज्येष्ठ साहित्यिक दगडू दादा लोमटे, सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रामराव आडे यांच्यासह व्यासपीठावर तात्या आभई आदर्श प्रतिष्ठानचे सचिव ॲड .राजेंद्र प्रसाद धायगुडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिष्ठानचे सचिव ॲड .राजेंद्रप्रसाद धायगुडे म्हणाले की, गुरूंनी दिलेले धडे गिरवत गिरवत इथपर्यंत प्रवास झाला आहे. जीवनाचा मार्ग ज्यांनी सुखकर केला त्यांच्या प्रतीची ही कृतज्ञता असल्याचे सांगत सामाजिक चांगुलपणा असणाऱ्या मान्यवरांना तात्या आभई आदर्श प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित केले जात असल्याचे सांगितले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.ज्यामध्ये

विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.अशोक विनायकराव कुलकर्णी यांना विधी सेवा गौरव पुरस्कार, आरोग्य सेवेतील विशेष कार्याबद्दल डॉ. देवराव बाबुराव चामनर यांना आरोग्य सेवा गौरव पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीमती रेखा सुभाष बडे-चोले यांना शिक्षण सेवा गौरव पुरस्कार, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशांत माणिकराव बर्दापूरकर यांना पत्रकारिता गौरव पुरस्कार तर सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेख मुख्तार चाचू यांना समाजसेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. योगेश्वरी नूतन विद्यालयाचे शिक्षक,साहित्यिक,कवी भागवत रामकृष्ण मसने व कु. रुद्राणी नवनाथ चौरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी दिवंगत ॲड.अण्णासाहेब लोमटे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, उपस्थिती लावली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद सोनर यांनी केले तर आभार प्रदर्शन रविकिरण सोन्नर यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande