नांदेड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालय युवक महोत्सव ज्ञानतीर्थ २०२५ चे अत्यंत साधेपणाने पुणे येथील एमडॉक चे संचालक रवींद्र पाल सिंगजी याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये पुणे येथील विलोचे उपाध्यक्ष रवींद्र उटगीकर, श्री व्हायब्रेशन टेकनॉलॉजिएसचे संचालक चेतन डाखोरे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सलग चार दिवसीय युवक महोत्सव साजरा होत आहे. यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टी,पूरग्रस्त परिस्थिती व ओला दुष्काळमुळे युवक महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा विद्यापीठाने संकल्प केला आहे. उदघाटन सोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला. कुठेही,धूमधडक्याचे स्वरूप नाही प्रमुख पाहुणे तथा अतिथी गण विद्यापीठ प्राधिकरणातील सदस्य व अधिकारी यांना कुठेही हारतुरे व शाल श्रीफळ तथा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नाही. केवळ मौखिक स्वागत करून सोपस्कार पार पाडण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी सदरील युवक महोत्सवामध्ये विविध कला प्रकारात सहभागी स्पर्धकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात असे सांगितले की, हा युवक महोत्सव अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या सारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या ऐवजी केवळ कलेची स्पर्धा म्हणून साधेपणाने आणि काटकसरीने घेतला जात असल्याबद्दल कुलगुरूंनी आयोजन समिती आणि महाविद्यालयाचे कौतुक केले.
यावर्षी युवक महोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. तथा विद्यापीठाच्या प्राधिकरणाचे सदस्य, समन्वयक समिती सदस्य तथा सल्लागार समिती सदस्य यांनी तथा परीक्षकांनी सुद्धा मानधन घेऊ नये, अशी नम्रपणे त्यांना विनंती केली.सदरील युवक महोत्सवात जास्तीत जास्त काटकसरपना करून युवक महोत्सव साजरा करूया व सदरील बचत खर्चाची रक्कम पूरग्रस्त व ओला दुष्काळासाठी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा संकल्प केला आहे.
युवक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून रविंदर पाल सिंग उपस्थित होते. ते म्हणाले, या आजच्या तरुणाईच्या टॅलेंटच्या जोरावर भारतदेश जगावर राज्य करू शकतो. एवढे टॅलेंट आपल्या देशात आहे. पुढे त्यांनी रोजगार शोधण्यापेक्षा रोजगार देणारे बना असा संदेश यावेळी त्यांनी दिला.
ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंटचे संकुल संचालक व यजमान आयोजक डॉ. विजय पवार यांनी सदरील महोत्सव सामाजिक उपकरणातून साजरा करण्यात येईल. तसेच चार दिवशीय युवक महोत्सवात सामाजिक प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज व दिवाकर चौधरी हे अवयव दान जनजागरण व त्याचे महत्व यावर प्रबोधन करणार आहेत. अशा सामाजिक विभूतीना यांना प्राचारण करण्यात आले आहे, असे सां विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र दादा चव्हाण यांनी यांच्या सुंदर आवाजात स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी
“अचल के तुझे में लेके चलू
एक ऐसे गगन के तले ..........
जहाँ गम भी न हो आसू भी न हो
बस प्यार हि प्यार पले.....गितले.”
हे गीत सादर केले.
विद्यापीठ विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेश्वर दुडुकनाळे यांनी आपल्या प्रस्ताविकेत,विविध कला प्रकारासाठी महाराष्ट्रातून परीक्षक यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदरील कलाप्रकारात पारदर्शकता ठेवण्यात आलेली आहे.कुठेही विद्यार्थ्यांच्या कला प्रकारांत अन्याय होणार नाही याची विद्यापीठाने काळजी घेतली आहे. या महोत्सवात ८५ महाविद्यालयातील १५०० स्पर्धक यांनी विविध कलेसाठी एकूण ३० कला प्रकारात सहभाग नोंदवलेला आहे. उदघाटन सोहळ्यात डॉ. शिवराज शिंदे व यांच्या संचाने हैदराबाद मुक्ती संग्रामचा पोवाड्याचे सादरीकरण केले. कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. यंदाच्या युवक महोत्सवामध्ये विशेषरित्या जास्तीत जास्त मुलींनी सहभाग नोंदवला आहे.
__________
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis