सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। पूरग्रस्त भागातील एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी केली. तसेच आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांनी दिली.
आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघातील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. त्यांनी वांगी वडकबाळ (ता. दक्षिण सोलापूर) व पाथरी, तेलगाव सीना, तिऱ्हे, पाकणी, शिवणी (ता. उत्तर सोलापूर) येथी नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी पुराच्या पाण्याने अने घरे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. पुरामुळे अनेकांचा व्यवसायही बुडाला आहे. त्यांच्या समस्या आमदार देशमुख यांनी जाणून घेतल्या.
एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी सूचना आमदार देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या. तसेच त्यासाठी आवश्यक कार्यवाही करायलाही त्यांना सांगितले. कोणतीही अडचण असल्यास नागरिकांनी आपल्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा. आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी पूरग्रस्तांना दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड