सरकारी मदतीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार -अशोक चव्हाण
नांदेड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अतिवृष्टीच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. परंतू राज्य सरकारने ३२ हजार कोटी रूपयाचे पॅकेज राज्यासाठी जाहिर केले. या पॅकेजचा फायदा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. भाजपा सरकारने सर्वात म
अ


नांदेड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।अतिवृष्टीच्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. परंतू राज्य सरकारने ३२ हजार कोटी रूपयाचे पॅकेज राज्यासाठी जाहिर केले. या पॅकेजचा फायदा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. भाजपा सरकारने सर्वात मोठे पॅकेज दिले आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

अतिवृष्टीचा पाऊस होऊन नांदेडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या सरकारने तब्बल ३२ हजार कोटी रूपयाच्या पॅकेजची घोषणा केली. या संदर्भात माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.

यावेळी पुढे बोलतांना खा. चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या महायुतीच्या सरकारने कोरडवाहू पिकांसाठी प्रती ३ हेक्टर पर्यंत ८ हजार ५००, बागायती पिकांसाठी १७ हजार रूपये, बहुवार्षिक पिकासाठी २२ हजार ५०० रूपये प्रती ३ हेक्टरी मदत जाहिर केली आहे. ३ हेक्टरच्या मर्यादीत शेतकऱ्यांसाठी १० हजार रूपये दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना किमान हेक्टरी ८ हजार ५०० रूपये अशी मदत मिळणार आहे. दुधाळ जणावरांसाठी ३७हजार ५०० रूपये प्रति जनावर, ओढकाम करणाऱ्या जणावरांसाठी ३२ हजार रूपये प्रति जनावर, लहान जनावरांसाठी २० हजार रूपये प्रति जनावर, शेळी-मेंढी साठी ४ हजार प्रति जनावर, कोंबडीसाठी १०० रूपयाची मदत अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील ४ हजार १३६ हेक्टर जमिन बाधीत झालेली आहे. गाळ काढण्यासाठी १८ हजार रूपये प्रति हेक्टर,अल्पभुधारक शेतकऱ्यांना ४७हजार रूपये प्रति हेक्टर आदी स्वरूपाची मदत केली जाणार आहे.विहीर दुरूस्तीसाठी ३० हजार रूपयाची मदत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीसाठी ४ लाख रूपये, अवयव किंवा डोळे निकामी होणे किंवा ४० ते ६० टक्के अपंगत्व येणे यासाठी ४७हजार रूपये, ६० टक्के अपंग असेल त्यांना २ लाख ५० हजार रूपये, अधिक काळ ऍडमीट असल्यास १६ हजार रूपये, कमी काळ ऍडमीट असल्यास ५ हजार ४०० रूपये आदी स्वरूपाची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande