परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड पंचायत समितीचे गणनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा गटांनुसार आरक्षणाची सोडत पार पडली.
सदर सोडतीनुसार आरक्षणाचे निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
धारासूर (गण क्र. ९५) – सर्वसाधारण
मुळी (९६) – सर्वसाधारण
महातपुरी (९७) – सर्वसाधारण महिला
अकोली (९८) – नागरिकांचा मागास प्रवर्ग
मरडसगाव (९९) – सर्वसाधारण
मालेवाडी (१००) – अनुसूचित जाती महिला
ईसाद (१०१) – सर्वसाधारण
माखणी (१०२) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
गुंजेगाव (१०३) – सर्वसाधारण महिला
खंडाळी (१०४) – सर्वसाधारण महिला
कोद्री (१०५) – सर्वसाधारण महिला
बडवणी (१०६) – सर्वसाधारण
राणीसावरगाव (१०७) – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पिंपळदरी (१०८) – अनुसूचित जाती
या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक पातळीवर निवडणूक प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता असून, विविध पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis