कोमोरोसला पराभूत करत घाना पाचव्यांदा फिफा विश्वचषकासाठी पात्र
आक्रा, १३ ऑक्टोबर (हिं.स.) कोमोरोसचा १-० ने पराभव करत घानाने २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यात केवळ एका गुणाची आवश्यकता असूनही, घानाने आक्रमक सुरुवात केली. पात्रता फेरीत घानाचा एकमेव पराभव करणाऱ्या कोमोरोसने कडवी लढत दिली
घानाचा फुटबॉल संघ


आक्रा, १३ ऑक्टोबर (हिं.स.) कोमोरोसचा १-० ने पराभव करत घानाने २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे. या सामन्यात केवळ एका गुणाची आवश्यकता असूनही, घानाने आक्रमक सुरुवात केली. पात्रता फेरीत घानाचा एकमेव पराभव करणाऱ्या कोमोरोसने कडवी लढत दिली. आणि तिसऱ्या मिनिटाला गोल करण्याची संधी निर्माण केली होती. पण पहिला हाफ गोल शून्य बरोबरीत राहिला.

दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला टोटेनहॅम हॉटस्परचा मिडफिल्डर मोहम्मद कुदुसने ४७ व्या मिनिटाला गोल करून सुमारे ३५,००० प्रेक्षकांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. या विजयासह, घानाने २५ गुणांसह गट १ मध्ये अव्वल स्थान मिळवत विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवली आहे. मादागास्कर १९ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि माली १८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. कोमोरोस, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आणि चाड अनुक्रमे १५, ८ आणि १ गुणांसह पिछाडीवर राहिले.

घाना यापूर्वी २००६, २०१०, २०१४ आणि २०२२ मध्ये फिफा विश्वचषक खेळला आहे. संघाची सर्वोत्तम कामगिरी २०१० मध्ये झाली होती. या संघाने त्यावेळी उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande