दिल्ली कसोटी - वेस्ट इंडिजचे सामन्यात पुनरागमन, तिसऱ्या दिवशी १७३/२ पर्यंत मजल
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.) दिल्ली कसोटी सामन्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसअकेर २ बाद १७३ धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारतापेक्षा ९७ धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीत किंवा या मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी केली
वेस्ट इंडिजचे फलंदाज


नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर (हिं.स.) दिल्ली कसोटी सामन्या वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवसअकेर २ बाद १७३ धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारतापेक्षा ९७ धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीत किंवा या मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आश्वासक फलंदाजी केली आहे. ३५ धावांत दोन विकेट्स गमावल्यानंतर, जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी आता २०७ चेंडूंत तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. कॅम्पबेल ८७ आणि होप ६६ धावांवर नाबाद आहेत. तेजनारायण चंद्रपॉलला सिराजने १० धावांवर बाद केले, तर अ‍ॅलिक अथानाझे 7 धावांवर सुंदरने बाद केले.

भारताने आपल्या पहिल्या डावात 5 बाद ५१८ धावा केल्या आणि डाव घोषित केला. त्यानंतर वेस्ट इंडिजचा पहिला २४८ धावांवर आटोपला होता. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना ३१९ धावांची आवश्यकता होती. पण त्यांना ७१ धावा कमी पडल्या. भारताने पहिल्या डावात २७० धावांची आघाडी घेतली आणि वेस्ट इंडिजला फॉलोऑन करण्यास भाग पाडले. तिसऱ्या सत्रात होप आणि कॅम्पबेलने चांगली कामगिरी केली. आणि आक्रमक क्रिकेट खेळले. त्यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरला आणि आणखी पडझड होणार नाही याची खात्री केली. कॅम्पबेलने आतापर्यंत 9 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत, तर होपने 8 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत.

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर आटोपला होता. त्यांनी ४ बाद १४० या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. वेस्ट इंडिजने उर्वरित 6 विकेट्स गमावल्या आणि १०८ धावा केल्या. कुलदीप यादवने आपल्या फिरकी गोलंदाजीने 5 विकेट्स घेतल्या. आता कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ विंडीज फलंदाजांना झटपट बाद करण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande