परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत गटनिहाय आरक्षण जाहीर
परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गटनिहाय आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात आले असून या आरक्षणाने काही मातब्बरांसह इच्छुकांचे चेहरे कमालीचे उजळले तर काहींचे चेहरे हिरमुसले. जिल्ह्यातील 9 तालुक्
जिल्हा परिषदेअंतर्गत गटनिहाय आरक्षण जाहीर


परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गटनिहाय आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात आले असून या आरक्षणाने काही मातब्बरांसह इच्छुकांचे चेहरे कमालीचे उजळले तर काहींचे चेहरे हिरमुसले. जिल्ह्यातील 9 तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छुक असणार्‍या विविध पक्षातील इच्छुकांचे आजच्या या सोडत पद्धतीच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित झाले होते. ईश्‍वरी चिठ्ठीद्वारे सोडत पद्धतीने काढलेल्या या आरक्षणाने सर्वच गटातील लढतीचे चित्रच स्पष्ट झाले.

गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

अनुसूचित जातीच्या 7 जागा लोकसंख्येच्या प्रमाणात निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कावलगाव, सावंगी म्हाळसा, उखळी बुद्रुक व पिंगळी हे चार गट अनुसूचित जाती महिलांसाठी तर चुडावा, ताडकळस व चाटोरी हे तीन गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण 14 गटातील आरक्षण सोडत पद्धतीने निश्‍चित करण्यात आले त्यामध्ये गौर, केकरजवळा देवनांद्रा, टाकळी कुंभकर्ण, वरुड, इसाद व रवळगाव हे गट ओबीसी महिलांसाठी तर वाघी धानोरा, मरडसगाव, कुपटा, पेठशिवणी, वझुर, जांब व लिंबा हे गट ओबीसीसाठी आरक्षित झाल्या आहेत.

यावेळी सर्वसाधारण महिलांकरिता एकूण 16 गट निश्‍चित करण्यात आले. त्यात वालूर, वस्सा, दैठणा, गुंजेगाव, रामपुरी बुद्रुक, नरवाडी, नृसिंह पोखर्णी, धारासुर, देऊळगाव गात, बोरी, महातपुरी, रावराजुर, टाकळी बोबडे, बाभळगाव, कोद्री व चारठाणा हे गट आरक्षित करण्यात आले.

याव्यतिरिक्त खूला गटाकरीता पेडगाव, वझुर, राणीसावरगाव, ताडबोरगाव, बनवस, शेळगाव, कासापुरी, झरी, हदगाव बु., एरंडेश्‍वर, कोल्हा, भोगाव, सिंगणापूर, लोहगाव, कौसडी व चिकलठाणा हे गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहेत.

दरम्यान, जिंतूर तालुक्यातील आडगांव बाजार हा गट अनुसूचित जमातीसाठी लोकसंख्येच्या तूलनेत आरक्षीत करण्यात आला आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande