पाथरी तालुक्यातील 47 एकल पालक व अनाथ बालकांची दिवाळी गोड
परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।मागील 15 वर्षा पासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित व एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जात आहे. यंदाही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड च
अ


परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।मागील 15 वर्षा पासून एचआयव्ही बाधित, अनाथ व वंचित व एकल पालक बालकांची दिवाळी आनंदात जावी यासाठी एचएआरसी संस्थे तर्फे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून या वंचित मुलांना मदत केली जात आहे. यंदाही होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थे तर्फे दिवाळी दान महोत्सव 2025 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवनांद्रा साकप पाथरी येथे तालुक्यातील 47 अनाथ व निराधार मुला मुलींना दिवाळी किट व निराधार विधवा ताईला नवीन साडीचे वाटप गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड, एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक, डॉ विष्णुदास राठी, राजेंद्र खापरे, अनंता कदम, यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविक डॉ पवन चांडक यांनी केले तर गटशिक्षणाधिकारी मुकेश राठोड यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषद शाळा रेणापुर जवळा झुटा, झरी, वडी, कासापुरी, अंधापुरी, बाभळगाव, विटा बुद्रुक, देवनांद्रा साकप या शाळेतील 47 एकल पालक व अनाथ मुलांची निवड करून त्यांना दिवाळी किट तर निराधार मातांना नवीन साडीचे वाटप करण्यात आले.

या दिवाळी किट मध्ये निराधार मातेला साडी तर अनाथ बालकांना ५ प्रकारचे फराळ - फरसाण, शंकरपाळे, बाकरवडी, चकली, बालुशाई, मोती साबण, सुगंधी हेअर ऑइल, उटणे, टूथपेस्ट, टूथब्रश, कंगवा, ब्लॅंकेट, शेंगदाणे चिक्की, राजगिरा लाडू, पॉड्स पॉवडर, शॅम्पु, आदी साहित्य, वाचन फराळ म्हणून किशोर मासिक चा समावेश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांनी दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ डोंगरे तर आभार प्रदर्शन भीमराव महिपाल यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय चिंचाणे, उत्तम दुगाने, नेताजी वाघाळे, धनराज दातखिळे, काकडे सर यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातील शिक्षक व पालक उपस्थिती होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande