हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट व परंपरा ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाखांचा धनादेश
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.) नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात परंपरा ग्रुपद्वारा आयोजित अंबाकुंभ रासगरबा कार्यक्रमात शेतकऱ्यांना मदतीचं दिलेलं वचन पूर्ण करत हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट व परंपरा ग्रुपने २१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता
हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट व परंपरा ग्रुपतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१ लाखांचा धनादेश सुपूर्द


अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात परंपरा ग्रुपद्वारा आयोजित अंबाकुंभ रासगरबा कार्यक्रमात शेतकऱ्यांना मदतीचं दिलेलं वचन पूर्ण करत हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट व परंपरा ग्रुपने २१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा धनादेश प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार रवि राणा आणि भाजपा नेत्या खासदार नवनीत राणा हे मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१६२८ कोटी रुपयांचे भरीव पॅकेज जाहीर केले आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रवि राणा म्हणाले, निसर्गाने साथ दिली नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचा हात दिला.या उपक्रमात सहभागी झालेल्या संस्था, आयोजक व कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. अंबाकुंभ रासगरबा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अनुपमा राणा, स्नेहल गुल्हाणे, सिमरन बजाज, नितु गोयनका यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande