बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील निमगावातील पुरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात अनेक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पुढे केला आहे. अतिवृष्टी आणि गोदावरी नदीच्या पुरामुळे निमगाव (ता. माजलगाव) परिसरात अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. घरांची छप्परे उडाली, शेतं वाहून गेली, जनजीवन विस्कळीत झालं
निमगावातील पुरग्रस्त बांधवांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू सुपूर्द केल्या. हे केवळ मदतकार्य नव्हे, तर मानवतेचा एक हात, आशेचा एक किरण आहे. हा उपक्रम पार पडण्यासाठी बऱ्याच नागरिकांनी मदत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis