पालघर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)|सागरी, नागरी आणि डोंगरी असा भूभाग असणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या विकासाकरिता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, यास अधिक गती मिळावी , जिल्हास्तरीय नियोजन सुरळीत व्हावे म्हणून जव्हार तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी ब्रिगेडचे माजी पालघर जिल्हा उपाध्यक्ष कोतवाल यांची जव्हार शहरातील सिम्फनी रिसॉर्ट येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मराठा सेवा संघाचे संस्थापक , अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते कोतवाल यांना नियुक्तीपत्र देऊन जबाबदारी देण्यात आली.
दरम्यान, यावेळी मराठा सेवा संघ समन्वयक अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, कोकण विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी तथा विविध पदाधिकारी आणि महिला वर्ग उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL