लातूर : पंचायत समिती सभापती पद आरक्षण जाहीर
लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापत निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्ह
अ


लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापत निश्चितीसाठी आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आरक्षण सोडतीमध्ये निलंगा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती (महिला), औसा पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती, उदगीर आणि चाकूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), लातूर पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकोट आणि रेणापूर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण (महिला), देवणी, अहमदपूर, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande