बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आयोजित नगर परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भातील कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे नेते मोहनदादा जगताप , माजी नगराध्यक्ष सुहास चाऊस, तालुकाध्यक्ष विश्वंभर थावरे, माजी नगरसेवक शरदराव यादव आदी उपस्थित होते.
बैठकीत नगर परिषद निवडणूक 2025 साठीच्या रणनितीवर, संघटन बळकटी, प्रभागनिहाय तयारी, कार्यकर्त्यांची सक्रिय भूमिका आणि मतदारांशी थेट संवाद वाढविण्याच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
माजलगाव नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) विजयी होणे हे आपले ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात पोहोचून पक्षाची विचारधारा व कार्य लोकांपर्यंत पोहोचवावे. संघटनेच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर आपण निश्चितच विजय संपादन करू. जनतेच्या हितासाठी, विकासाच्या वाटचालीसाठी पक्ष सज्ज आहे, असे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
बैठकीत स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते आणि विविध प्रभागातील जबाबदार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन माजलगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे करण्यात आले.यावेळी काही नवीन निवडी करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis