मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांना २८ ऑक्टोबरपर्यंत सुट्टी
छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान दिपावली सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक स
अ


छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांना १५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या दरम्यान दिपावली सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शैक्षणिक सत्र सुरु होण्याच्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सदरील वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. यानुसार युवक महोत्सव, आविष्कार महोत्सव घेण्यात आला. १५ ऑक्टोबरपासून दिपावली सुट्टी असणार आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत ही सुट्टी राहील तर ५ नोव्हेंबर रोजी द्वितीय सत्र सुरु होणार आह, असे शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी कळविले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य परिसर व धाराशिव उपपरिसर या ठिकाणी २८ ऑक्टोबर या दरम्यान शैक्षणिक विभागांना सुट्टी राहील. तर दोन्ही ठिकाणच्या प्रशासकीय विभागांना १८ ते २६ ऑक्टोबर अशी नऊ दिवसाची सुट्टी असणार आहे. या काळात विद्यापीठातील परीक्षा, लेखा, अस्थापना आदी सर्व प्रशासकीय विभागांनाही सुट्टी राहील, असे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे. विद्यापीठातील प्रशासकीय विभाग २७ ऑक्टोबर तर शैक्षणिक विभाग २९ ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande