- धनंजय मुंडे राहणार उपस्थित
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । येत्या 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी महाएल्गार सभा आयोजित केली आहे. दरम्यान या महाएल्गार सभेला माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
बीडमध्ये आयोजित ओबीसी महाएल्गार सभेसाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासह प्रमुख ओबीसी नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सभेमधून 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहभागाबद्दल आयोजकांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. ही सभा म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजाच्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
यापूर्वी झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा जीआर रद्द करण्याचा निर्धार करण्यात आला होता आणि आता महाएल्गार सभेतून हीच मागणी अधिक जोरकसपणे मांडली जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis