रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूखवासीयांना दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी येत्या शनिवारी, दि. १८ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता अभिरुची संस्थेतर्फे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात ही विशेष मैफल रंगणार आहे.
स्थानिक गुणी कलाकारांचा गौरव व्हावा त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, या हेतूने ही मैफिल होणार आहे. त्यामध्ये सौ. नेहा प्रभुघाटे-साधले, सिद्धी शितूत व कुणाल भिडे यांचे गायन होणार आहे. मैफलीला अथर्व आठल्ये यांची तबलासाथ व चैतन्य पटवर्धन यांची संवादिनीसाथ लाभणार आहे.
दीपोत्सवाबरोबरच संगीत मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष आशीष प्रभुदेसाई यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी