नागपूर हा धर्मांतराचा कळस, तर येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया - भुजबळ
येवला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६
नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया - भुजबळ


येवला, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल २१ वर्षांनी १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

येवला मुक्ती भूमी धर्मांतर घोषणा दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन,येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, शहराध्यक्ष दीपक लोणारी यांच्यासह पदाधिकारी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande