नांदेड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून घेऊन दिलेल्या अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.
अनुक्रमे फळपिक, समाविष्ट धोके, विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.), शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) पुढीलप्रमाणे आहे.
फळपिक द्राक्ष- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 3 लाख 80 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 19 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 1,27,00, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 6 हजार 350 आहे.
फळपिक मोसंबी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 5 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 1 हजार 650 आहे.
फळपिक केळी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे.
फळपिक अंबा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे.
फळपिक संत्रा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 7 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 1 हजार 650 आहे.
फळपिक पपई- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 40 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 13 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 650 आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis