लातूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)साहित्य सारथी कला मंच लातूर तर्फे आयोजित सातव्या वर्धापन दिनानिमित्त, राज्यस्तरीय साहित्य संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आले होते. यात लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय उदगीरच्या आदर्श शिक्षिका तथा साहित्यिका नीता मोहनराव मोरे यांना साहित्य सारथी विद्यारत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांना हा पुरस्कार,या कार्यक्रमाचे उद्घाटक लातूर जिल्हा प्रमुख शिवसेना उबाठा श्री संतोष सोमवंशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय संपादक जयप्रकाश दगडे, इतिहास अभ्यासक श्री विवेक सौताडेकर, पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील, प्रसिद्ध युवा वक्ते श्री सुनील धनगर, ज्येष्ठ कवी व वात्राटिकाकार श्री भारत सातपुते, ऍड दिपाली औटे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष श्री मधुकरराव वट्टमवार, केंद्रीय सदस्य तथा कार्यवाह श्री शंकरराव लासुणे, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री सतनप्पा हुरदळे, किरण नेमट यांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis