ओलिसांच्या सुटकेच्या तयारीदरम्यान नेतान्याहू यांचा भावनिक संदेश
जेरुसलेम, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्त्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओलिसांच्या सुटकेच्या तयारी दरम्यान इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सायंकाळी एक भावनिक संदेश शेअर केला. त्यांनी लिहिलं, “ही अश्रूंनी आणि आनंदाने भरलेली सायं
नेतान्याहू


जेरुसलेम, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।इस्त्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ओलिसांच्या सुटकेच्या तयारी दरम्यान इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सायंकाळी एक भावनिक संदेश शेअर केला. त्यांनी लिहिलं, “ही अश्रूंनी आणि आनंदाने भरलेली सायंकाळ आहे, कारण उद्या आपल्या मुलांचा आपल्या सीमांवर परत येण्याचा दिवस आहे.” माहितीनुसार, सोमवारी (दि.१३) शांतता योजनेअंतर्गत हमास २० ओलिसांची सुटका करणार आहे.

पंतप्रधान नेतन्याहू यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, “इस्त्रायली नागरिकांनो, माझ्या बंधू-भगिनींनो, ही एक भावनिक सायंकाळ आहे. अश्रूंची सुद्धा आणि आनंदाची सुद्धा. कारण उद्या मुले आपल्या सीमांवर परतणार आहेत.” नेतन्याहू यांनी सांगितले की इस्त्रायल सर्व ओलिसांना त्वरित परत आणण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. पंतप्रधान कार्यालयाने माहिती दिली की नेतन्याहू यांनी ओलिस आणि बेपत्ता व्यक्तींसाठी समन्वयक ब्रिगेडियर जनरल (नि.) गाल हिर्श यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. पोस्टमध्ये लिहिलं होतं, “पंतप्रधान नेतन्याहू: इस्त्रायल पूर्णपणे सज्ज आहे — आम्ही आमचे सर्व बंदिवान तात्काळ परत घेण्यासाठी तत्पर आहोत.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर झालेल्या युद्धविराम कराराअंतर्गत इस्त्रायल सुमारे २,००० फिलिस्तिनी कैद्यांची सुटका करणार असून गाझा पट्टीत पूर्ण मानवी मदतीला परवानगी देण्यात येणार आहे. सध्या गाझामध्ये तीव्र अन्नसंकट आणि दारुण उपासमार सुरू आहे.

इस्त्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्झोग यांनी तेल अवीवमध्ये आयोजित कार्यक्रमात म्हटलं की, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे, जो मध्यपूर्वेत नव्या आशा निर्माण करू शकतो.” त्यांनी पुढे म्हटलं, “हा करार सोपा नव्हता, यात अनेक वेदनादायक पैलू आहेत, पण हा एक असा क्षण आहे जो खऱ्या बदलाची आशा निर्माण करतो.”

हर्झोग यांनी सांगितले की इस्त्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारी होणाऱ्या दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत आहे. “आम्ही त्यांचे स्वागत करण्यास तयार आहोत आणि या ऐतिहासिक प्रयत्नात त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचे अंतःकरणपूर्वक आभार मानतो,” असंही त्यांनी सांगितलं.

इस्त्रायलची इच्छा आहे की अमेरिकेने या कराराच्या पुढील टप्प्यांतही सक्रिय भूमिका बजावावी, जेणेकरून गाझा आणि संपूर्ण मध्यपूर्वेत स्थायी शांतता प्रस्थापित होऊ शकेल. इस्त्रायलने जाहीर केलं आहे की ओलिसांच्या सुटकेनंतर ते सुमारे २,००० फिलिस्तिनी कैद्यांना सोडण्यासाठी तयार आहे. यामध्ये २५० लोक आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहेत, तर सुमारे १,७०० लोकांना गाझामधून कोणतेही आरोप न लावता ताब्यात घेण्यात आले आहे.

इस्त्रायलचे ओलिस व बेपत्ता व्यक्तींचे समन्वयक गाल हिर्श यांनी सांगितले की, एक आंतरराष्ट्रीय टास्क फोर्स पुढील ७२ तासांमध्ये अशा ओलिसांना शोध सुरू करेल ज्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. अनेक ओलिस ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande