काबूल, 12 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी हवाई हल्ल्यानंतर आता अफगाणिस्ताननेही पाकिस्तानी लष्करावर प्रतिहल्ला केला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत. याशिवाय, अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या २५ चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
हेलमंद प्रांताचे माहिती आणि संस्कृती संचालक राशिद हेलमंदी यांनी अफगाणिस्तानच्या माध्यमाला सांगितले की, अफगाण सुरक्षा दलांनी काल रात्री हेलमंदच्या बहरामचा परिसरातील शाकिज, बीबी जानी आणि सालेहान या भागांमध्ये तीन तासांपर्यंत ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांकडून ५ कलाश्निकोव्ह रायफल्स, एक रायफल, एक नाईट व्हिजन स्कोप आणि एका सैनिकाचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. या ऑपरेशन्सदरम्यान पाकिस्तानच्या २५ चौक्यांवर ताबा मिळवण्यात आला आहे. एकूण ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून ३० पेक्षा अधिक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवर सध्या तणाव आहे. ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिका या भागांमध्ये टीटीपी (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) चा प्रमुख नूर वली मेहसूद याला लक्ष्य करत हवाई हल्ला केला होता. आता अफगाणिस्तानकडून पाक सैनिकांवर करण्यात आलेली ही कारवाई त्याच हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आलेली प्रतिहल्ला असल्याचे मानले जात आहे. हा अफगाणिस्तानकडून पाकिस्तानला दिलेला हा एक संदेश आहे की, तोही प्रत्युत्तर देण्याची पूर्ण क्षमता ठेवतो. असं सांगितलं जात आहे मी. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाण लष्कराने नंगरहार आणि कुनार प्रांतात ड्युरंड रेषेजवळ असलेल्या पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला चढवला.
मीडिया रिपोर्टनुसार, अफगाण लष्कराने पाकिस्तानच्या २५ चौक्यांवर ताबा मिळवलेला आहे. या संघर्षात पाकिस्तानला मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. अफगाण सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना जोरदार प्रतिकार देत मोठी धक्का दिला आहे.पाकिस्तानने अफगाणिस्तानवर तेव्हा हल्ला केला होता, जेव्हा तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी ८ दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode