बीड - बिबट्याच्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील एकाचा मृत्यू
बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)आष्टी तालुक्यातील बावी येथील तरुण राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (३६) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सोमवारी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. राजेंद्र गो
बीड - बिबट्याच्या हल्ल्यात आष्टी तालुक्यातील एकाचा मृत्यू


बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)आष्टी तालुक्यातील बावी येथील तरुण राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (३६) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

सोमवारी पहाटे ४ ते ४.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. राजेंद्र गोल्हार शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. शेतात त्यांचा मुलगा बैल चारत होता, तर वडील बाजूला काम करत होते. अंधार पडूनही वडील जवळ न आल्याने मुलाने ग्रामस्थांना याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी शेतात शोधमोहीम सुरू केली.

घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी गर्कळ व वनपरीक्षेत्राधिकारी मुंडे यांनी तात्काळ सूचना देऊन ग्रामस्थांसह शोधमोहीम राबवली. डोंगराळ परिसरात मृतदेह आढळून आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, आष्टी येथे पाठविण्यात आला आहे.

या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबास शासनाची मदत मिळावी यासाठी वन विभाग व प्रशासनास आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande