पालघर पोलिसांचा वरोर समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम
पालघर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : वाढवण येथील बंदोबस्तादरम्यान पालघर पोलीस दलाने पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा संदेश देत वरोर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी किनाऱ्यावर जमा झालेल्या प्लास्टिकच्या
वाढवण बंदोबस्तादरम्यान पालघर पोलिसांचा वरोर समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम


पालघर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : वाढवण येथील बंदोबस्तादरम्यान पालघर पोलीस दलाने पर्यावरण संवर्धन आणि समाजप्रबोधनाचा संदेश देत वरोर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविले.

या उपक्रमात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी किनाऱ्यावर जमा झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. या माध्यमातून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडली.या स्वच्छता मोहिमेत बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते (वाणगांव पोलीस ठाणे) तसेच आठ पोलीस अधिकारी आणि सुमारे १८० पोलीस कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL


 rajesh pande