रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने आयोजित माजी ग्रंथपाल स्व. ल. वा. साने गुरुजी स्मृती खुल्या लेख स्पर्धेचा निकाल जाहीर केला आहे. स्पर्धेत नाशिकच्या प्रांजली अजय आफळे आणि पुण्याचे आदित्य नागनाथ फड प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.होय, माझी मराठी, समृद्ध मराठी या विषयात नाशिकच्या प्रांजली अजय आफळे प्रथम, तर मराठी भाषा आणि परप्रांतीय या विषयात पुण्याचे आदित्य नागनाथ फड प्रथम आले. स्पर्धेसाठी पन्नास लेख आले होते.
होय, माझी मराठी, समृद्ध मराठी या विषयात मञ्जिद अब्दुल्ला काझी (कासे) यांनी द्वितीय, निवृत्ती सयाजी जोरी (छत्रपती संभाजीनगर) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ स्वाती जोशी (कोल्हापूर), मुग्धा टेंगशे (कोल्हापूर), सरिता गोखले (देवरूख), माधवी भूत (नागपूर), डॉ. राजेश जोशी (सातारा), रेखा सोनारे (नागपूर), अश्विनी भावे (पुणे), वर्षा काळे (रत्नागिरी), प्रेरणा खवळे (देवरूख) आणि आर्या पेंढारकर (काटवली) यांची निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा आणि परप्रांतीय या विषयासाठी एकूण १७ लेख आले होते. या विषयात स्पृहा सुरेश इंदू (मुंबई) यांनी द्वितीय, श्रीपाद दामोदर टेंबे (पुणे) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी वर्षा शरद पोंक्षे (माखजन) आणि रवींद्र भालचंद्र भागवत (कल्याण) यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना रोख रक्कम, ग्रंथ भेट आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी