– मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवली हिरवी झेंडी
अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेकडो घरं जमीनदोस्त झाली, नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. अशा संकटग्रस्त पूरग्रस्त कुटुंबीयांसाठी माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पुढाकार घेत आज धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी तीन ट्रक अन्नधान्य व किराणा साहित्य पाठवले.
या उपक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून मदतीच्या ट्रकना धाराशिवच्या दिशेने रवाना केले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना म्हटलं की, “अशा संकटाच्या काळात समाजातील प्रत्येकाने आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. पोटे पाटील यांनी दिलेली ही मदत गरजूंपर्यंत पोहोचेल आणि त्यांना दिलासा मिळेल.”पूरग्रस्त भागातील जनतेवर मोठं संकट ओढावलं आहे. ही केवळ मदत नसून आपुलकीची भावना आहे. ही केवळ सुरुवात आहे. गरज भासल्यास आणखी मदत दिली जाईल,असे माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी