अलिबागची प्रिया पाटील बनली ‘रायगड फोटो सुंदरी 2025’
रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने अलिबाग येथे आयोजित ‘फोटो एक्स्पो 2025’ मध्ये झालेल्या फॅशन शो स्पर्धेत अलिबागची प्रिया पाटील हिने ‘रायगड फोटो सुंदरी 2025’ हा मानाचा किताब पटकवला. फॅशन फोटोग्राफी
फॅशनच्या रॅम्पवर अलिबागची प्रिया पाटील चमकली; रायगड फोटो सुंदरीचा मुकुट तिच्या शिरपेचात


रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने अलिबाग येथे आयोजित ‘फोटो एक्स्पो 2025’ मध्ये झालेल्या फॅशन शो स्पर्धेत अलिबागची प्रिया पाटील हिने ‘रायगड फोटो सुंदरी 2025’ हा मानाचा किताब पटकवला.

फॅशन फोटोग्राफी आणि मॉडेल फोटोग्राफीचा अनुभव छायाचित्रकारांना मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील 26 स्पर्धकांनी या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सहभाग नोंदविला होता. कोरिओग्राफर गौरव पाटील यांनी त्यापैकी निवडक 14 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली.वेस्टर्न वेशभूषेत रॅम्पवॉक करताना प्रिया पाटीलने उत्कृष्ट आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाची झलक दाखवून परीक्षकांचे लक्ष वेधले. सिद्धी वाकडे हिने द्वितीय तर पूजा बांधरकर हिने तृतीय क्रमांक पटकवला. विजेत्यांना पेण नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर तृप्ती नाईक (मुंबई) आणि राजेंद्र तुपे (ठाणे) यांनी काम पाहिले.कार्यक्रमाला फोटोग्राफर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक सुभेकर, विद्यमान अध्यक्ष समीर भायदे, उपाध्यक्ष समीर मालोदे, सचिव आनंद निंबरे, खजिनदार जितेंद्र मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भगत यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande