“मानसिक आरोग्यात व्यक्तीसोबत समाज, देश व जग बदलण्याची ताकद” — डॉ. गोविंद यादव
परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। “मानसिक आरोग्य हे केवळ व्यक्तीच्या आयुष्यापुरते मर्यादित नसून त्यात समाज, देश आणि संपूर्ण जग बदलण्याची ताकद दडलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपा
अ


परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।

“मानसिक आरोग्य हे केवळ व्यक्तीच्या आयुष्यापुरते मर्यादित नसून त्यात समाज, देश आणि संपूर्ण जग बदलण्याची ताकद दडलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हा सामान्य रुग्णालय परभणीचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. गोविंद यादव यांनी केले.

शारदा महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गोविंद यादव, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. संतोष नाकाडे, मानसोपचारक नूरजहाँ बेगम, मानसशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन. व्ही. सिंगापुरे व प्रा. डॉ. गोपाल पेदापल्ली विचारमंचावर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ. यादव म्हणाले की, “मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर विचार, भावना व वर्तन यांतील संतुलन होय. आजच्या स्पर्धात्मक जगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, ताणतणाव आणि जीवनशैलीतील असंतुलन यामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.” ते पुढे म्हणाले, “समाजात अजूनही मानसिक आजारांविषयी गैरसमज आहेत. अनेकांना मानसिक आजाराची जाणीव नसल्याने ते मानसोपचार घेत नाहीत. म्हणूनच मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आणि आरोग्यसेवक यांची जाणीवजागृतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.”

डॉ. यादव यांनी मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान, योग, प्राणायाम, शिथिलीकरण तंत्र आणि भावनांवर नियंत्रण यांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande