पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयाचा धनादेश राजर्षि शाहू सहकारी बँकेच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले.
यावेळी राजर्षि शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, उपाध्यक्षा कमल व्यवहारे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे आदी उपस्थित होते.
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,
राज्य शासनाच्या वतीने नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्याचे काम करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु