पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) । पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७३ गटांपैकी आरक्षणाची सोडत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली.
या सोडतीनुसार अनुसूचित जातीसाठी ७, अनुसूचित जमातीसाठी ५, तर नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गासाठी १९ गट राखीव ठेवण्यात आले असून, त्यापैकी १० जागा महिलांसाठी आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४२ गट राखीव असून, त्यापैकी २० गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विविध प्रवर्गांनुसार सदस्यपदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी जागा राखीव करण्यात आल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु