पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.)पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठीपुणे आर्टिस्ट ग्रुप तर्फे 'वाटा खारीचा सहभाग चित्रकारांचा' या उपक्रमांतर्गत एक महाचित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बुधवार,१५ ऑक्टोबर२०२५ पासून शनिवार,१८ ऑक्टोबर२०२५ पर्यंत बालगंधर्व कलादालन, पुणे येथे भरविण्यात येणार आहे.सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असेल.राज्यातील तीनशे पेक्षा अधिककलाकारसहभागी होणार आहेत.त्यांच्या एकूण कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असून सर्व चित्रांची किंमत समान असेल. ही किंमत अतिशय नाममात्र म्हणावे अशी आहे. विक्रीतून जमा झालेली सर्व रक्कम मराठवाड्यातील मुलांच्या शिक्षण साहित्यासाठी देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनात पुणे,मुंबई,ठाणे,कोल्हापूर,सांगली,नाशिक,सातारा,छत्रपतीसंभाजीनगर अशा शहरातील चित्रकारांच्या कलाकृती असणार आहेत.चित्रकार यासाठी कोणताही मोबदला घेणार नाहीत.कलाप्रेमी आणिसंवेदनशील पुणेकरांनी प्रदर्शनाला भेट द्यावी.तसेच प्रत्येकाने कमीतकमी एक आणि शक्य होईल त्याप्रमाणे अधिकाधिक चित्रे विकत घ्यावीत,असे आवाहन 'पुणे आर्टिस्ट ग्रुप'तर्फेचित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांनी केले आहे.आधिक माहिती साठी चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील .98 81 23 24 25 यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात चित्रकारांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत आपापल्या कलाकृती देणगीस्वरूपात प्रदर्शनासाठी दिल्या आहेत. या कलाकृतींच्या विक्रीतून जमा होणारी संपूर्ण रक्कम पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षण साहित्य खरेदीसाठी वापरली जाणार आहे.पुणे आर्टिस्ट ग्रुपने यापूर्वीही कोल्हापूर-सांगली पूरस्थितीत मदतकार्य केले असून, त्या वेळी संवेदनशील कलाकारांनी देणगीस्वरूपात दिलेल्या कलाकृतींच्या विक्रीतून लाखो रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी वापरण्यात आली होती. यंदा मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कलाकार पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु