रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) | राजापूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या बारा गणांचे आरक्षणही जाहीर झाले आहे.
राजापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पाच सर्वसाधारण, चार सर्वसाधारण महिला, दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि एक नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित झाले आहेत. राजापूरच्या उपविभाग अधिकारी डॉ.
जैस्मिन, तहसीलदार विकास गंबरे, नायब तहसीलदार विलास सरफरे, राजापूरचे गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पांडुरंग शिद यासह तहसील कार्यालयीन कर्मचारी तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण 12 गण असून त्यामध्ये वडदहसोळ,रायपाटण ,तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाटी, धोपेश्वर,पेंडखले, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश होतो. त्यांच्या आरक्षणाचा गणनिहाय तपशील असा -
१०१- वडद हसोळ - सर्वसाधारण
१०२-रायपाटण - सर्वसाधारण
१०३- तळवडे - सर्वसाधारण, महिला
१०४-ताम्हाणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
१०५- केळवली - सर्वसाधारण, महिला
१०६-जुवाटी - नागरिकांचा मागास प्रवर्ग
१०७-धोपेश्वर - सर्वसाधारण
१०८-पेंडखले - सर्वसाधारण
१०९-नाटे- नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
११०-साखरीनाटे- सर्वसाधारण, महिला
१११-अणसुरे - सर्वसाधारण, महिला
११२-कातळी - सर्वसाधारण
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी