रत्नागिरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी
रत्नागिरी पंचायत समितीचे आरक्षण जाहीर


रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. एकूण वीस गणांसाठीचे आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आणि तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया पार पडली.

आरक्षणानुसार दहा गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले. त्यामध्ये नाणीज गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. सर्व जागांच्या आरक्षणाचा तपशील असा - महिलांसाठी राखीव प्रवर्ग : वाटद, कळझोंडी, नेवरे, झाडगाव (रत्नागिरी पालिकेबाहेर), गावखडी आणि भाट्ये हे ६ गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. खालगाव, हातखंबा, आणि कर्ला गणांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलेला संधी मिळाली आहे. सर्वसाधारण जागा : करबुडे, कोतवडे, साखरतर, खेडशी, केळ्ये, कुवारबाव, नाचणे आणि गोळप हे आठ गण सर्वसाधारण गट/प्रवर्ग म्हणून खुले आहेत. मागासवर्गीयांसाठी राखीव : नाणीज गण अनुसूचित जाती प्रवर्ग (SC) साठी राखीव झाला आहे. हरचिरी आणि पावस हे २ गण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande