जालना जिल्हा परिषदेसाठी तालुकानिहाय गटांसाठी आरक्षण निश्चित
जालना, 13 ऑक्टोबर (हिं.स.) जालना जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्
अ


जालना, 13 ऑक्टोबर (हिं.स.)

जालना जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे तालुकानिहाय गटामध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग 15, सर्वसाधारण 33, अनुसूचित जाती 8, अनुसूचित जमाती 1 असे गटनिहाय आरक्षण निश्चित झाले. तसेच पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी देखील आरक्षण सोडत पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) नम्रता चाटे, नायब तहसिलदार तुषार निकम यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद मतदारसंघासाठी झालेल्या गट निहाय आरक्षण खालील प्रमाणे आहेत.

भोकरदन तालुक्यातील गट

वालसावंगी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पारध बु. - नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळगाव सपकाळ - अनुसूचित जमाती (महिला), आन्वा - सर्वसाधारण (महिला), वालसा वडळा - सर्वसाधारण, आव्हाना - नागरिकांचा मागास प्रवर्ग, सोयगाव देवी - सर्वसाधारण (महिला), नळणी बू.-सर्वसाधारण, हसनाबाद-नागरिकांचा मागास प्रवर्ग, चांदई ठोंबरी - सर्वसाधरण (महिला), राजूर - अनुसूचित जाती (महिला).

जाफ्राबाद तालुक्यातील गट

वरूड बू.- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), माहोरा - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जवखेडा ठेंग - अनुसूचित जाती (महिला), सिपोरा अंभोरा - अनुसूचित जाती (महिला), टेंभूर्णी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, अकोला देव - नागरिकांचा मागास प्रवर्ग.

बदनापूर तालुक्यातील गट

दाभाडी - सर्वसाधारण (महिला), बावणे पांगरी - अनुसूचित जाती, गेवराई बाजार - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), शेलगाव – अनुसूचित जाती, रोषनगाव – सर्वसाधारण (महिला).

जालना तालुक्यातील गट

वाघ्रुळ जहाँगीर – अनुसूचित जाती, पीरकल्याण– सर्वसाधारण (महिला), मोजपूरी– सर्वसाधारण, शेवली - अनुसूचित जाती, नेर – सर्वसाधारण, रामनगर – सर्वसाधारण (महिला), देवमुर्ती – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), रेवगाव – अनुसूचित जाती (महिला), भाटेपूरी – सर्वसाधारण.

मंठा तालुक्यातील गट

तळणी– सर्वसाधारण, खोराड सावंगी – सर्वसाधारण, जयपूर – सर्वसाधारण, हेलस – सर्वसाधारण, पांगरी गोसावी – सर्वसाधारण (महिला), केंधळी – नागरिकांचा मागास प्रवर्ग.

परतूर तालुक्यातील गट

वाटूर – सर्वसाधारण, सातोना खुर्द – सर्वसाधारण (महिला), पाटोदा माव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), आष्टी – सर्वसाधारण (महिला), कोकाटे हदगाव – सर्वसाधारण (महिला).

घनसावंगी तालुक्यातील गट

राणीउंचेगाव – सर्वसाधारण, रांजणी – सर्वसाधारण, गुरुपिंपरी – सर्वसाधारण, मच्छिंद्रनाथ चिंचोली – सर्वसाधारण, कुंभारपिंपळगाव - सर्वसाधारण (महिला), अंतरवाली टेंभी – सर्वसाधारण (महिला), राजाटाकळी – सर्वसाधारण (महिला)

अंबड तालुक्यातील गट

रोहिलागड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पारनेर – सर्वसाधारण (महिला), जामखेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग, ताडहादगाव – सर्वसाधारण, धाकलगाव – सर्वसाधारण (महिला), साष्टपिंपळगाव – सर्वसाधारण, गोंदी – सर्वसाधारण, शहागड – सर्वसाधारण.

जालना जिल्ह्यातील 8 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत

भोकरदन - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), जाफ्राबाद - अनुसुचित जाती, जालना - नागरिकांचा मागास प्रवर्ग, मंठा – सर्वसाधारण, बदनापूर – सर्वसाधारण, घनसांवगी - सर्वसाधारण (महिला), परतूर - सर्वसाधारण (महिला), अंबड - सर्वसाधारण (महिला) याप्रमाणे राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande