कर्जत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; माणगाव वॉर्डात महेश विरले ?
रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कर्जत-खालापूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, महिला आरक्षणामुळे काही म
कर्जत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर; माणगाव वॉर्डात महेश विरले ?


रायगड, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : राज्यात पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर कर्जत-खालापूर परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांची समीकरणे पूर्णपणे बदलली असून, महिला आरक्षणामुळे काही मोठ्या नावांची उमेदवारीची स्वप्ने कोलमडली आहेत.

मात्र, माणगाव तर्फे वरेडी पंचायत समिती वॉर्डात प्रामुख्याने चर्चेत असलेले विद्यमान सरपंच महेश विरले यांना या आरक्षणातून मोठी राजकीय संधी मिळण्याची चर्चा होत आहे. माणगाव पंचायत समिती वॉर्डात सर्वसाधारण आरक्षण ठरले असून, कर्जत पंचायत समिती सभापती पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण निश्चित झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून महेश दादा विरले यांच्या माध्यमातून माणगाव परिसरात सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. दिवाळी वाटप, छत्री वाटप, मोफत अॅम्ब्युलन्स सेवा यांसारखे लोकहिताचे कार्यक्रम त्यांनी वेळोवेळी हाती घेतले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे जनतेत त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

महेश विरले दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक गावात व घराघरांत दिवाळी फराळ देऊन लोकांशी संवाद साधतात. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश दादा विरले यांची सभापती पदाकडे वाटचाल सुकर होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande