रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : पोमेंडीखुर्द येथील कृषी चिकित्सालय फळरोप वाटिके मध्ये फलोत्पादन पिकावरील कीडरोग सर्व्हेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत कार्यशाळा संपन्न झाली. तिला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
कार्यशाळेत रत्नागिरी जिल्हा कृषी अधीक्षक शिवकुमार सदाफुले, उपविभागीय कृषी अधिकारी फिरोज शेख आदी उपस्थित होते. कार्यशाळा दोन सत्रामध्ये घेण्यात आली.
फिरोज शेख यांनी प्रास्ताविक केले. कृषी विद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. हणमंते यांनी नैसर्गिक शेती विषयावर माहिती सांगितली. शास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी आंबा व काजूपिकावरील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनावर माहिती दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी