रत्नागिरीत १५ ऑक्टोबरला संस्कृत ऑर्केस्ट्रा
रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाने येत्या बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी संस्कृत ऑर्केस्ट्रा आयोजित केले आहे. संस्कृत ऑर्केस्ट्रा अर्थात संस्कृत गीतवृंद हा संस्कृत लोकप्रिय करण्या
रत्नागिरीत १५ ऑक्टोबरला संस्कृत ऑर्केस्ट्रा


रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाने येत्या बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी संस्कृत ऑर्केस्ट्रा आयोजित केले आहे.

संस्कृत ऑर्केस्ट्रा अर्थात संस्कृत गीतवृंद हा संस्कृत लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न आहे. संस्कृत भाषेमध्ये गीतरचना आहे हेही यानिमित्ताने लोकांपर्यंत पोहोचते. संस्कृतमध्ये फक्त प्राचीन साहित्य आहे, असा एक समज असतो. परंतु या भाषेतही सातत्याने साहित्य निर्मिती होत आहे, त्यातच गीतलेखन हाही एक प्रकार आहे, याची ओळख या कार्यक्रमामधून होते.

फर्ग्युसन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रा. ना. दांडेकर एकांकिका स्पर्धेमध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने भाग घेतला होता. त्यामध्ये विशेष सन्मान मिळालेले आणि स्त्री अभिनयाचे प्रथम पारितोषिक मिळालेले भास लिखित 'मध्यमव्यायोग' या नाटकाचा प्रयोगही यादरम्यान होणार आहे. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाने युवा महोत्सवामध्ये पारितोषिक मिळविलेली गीतेही सादर होणार आहेत. या कार्यक्रमासाठी १०० रुपये प्रवेशिका आहे. इट्स माय शो या डिजिटल प्लॅटफॉर्मवर https://itsmyshow.in/home या लिंकवर नोंदणी करता येईल.

बुधवारी सायंकाळी ५ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात संस्कृत-संस्कृति-संध्या अर्थात संस्कृत ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद रत्नागिरीकरांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande