रत्नागिरी : जनसेवातर्फे मंगळवारी शब्दांकुर प्रकाशन, वाचक पुरस्कार सोहळा
रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील जनसेवा ग्रंथालयाच्या हस्तलिखित ‘शब्दांकुर-२५’ अंकाचे प्रकाशन आणि जनसेवा ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ प्रदान सोहळा मंगळवारी, दि.14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. जनसेवा ग्रंथा
रत्नागिरी : जनसेवातर्फे मंगळवारी शब्दांकुर प्रकाशन, वाचक पुरस्कार सोहळा


रत्नागिरी, 13 ऑक्टोबर, (हिं. स.) : येथील जनसेवा ग्रंथालयाच्या हस्तलिखित ‘शब्दांकुर-२५’ अंकाचे प्रकाशन आणि जनसेवा ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ प्रदान सोहळा मंगळवारी, दि.14 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शब्दांकुर हे हस्तलिखित प्रकाशित केले जाते. या हस्तलिखित उपक्रमातून नवोदित साहित्यिकांना लेखनासाठी संधी देण्यात येते, तसेच प्राचीन लेखन परंपरेची जपणूक होते. गेली २५ वर्षे जनसेवा ग्रंथालय शब्दांकुर हे हस्तलिखित साकारत आले आहे. यावर्षीच्या हस्तलिखिताचे प्रकाशन 14 ऑक्टोबर रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते होणार आहे. लक्ष्मी चौकातील जनसेवा ग्रंथालयामध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

याच कार्यक्रमात जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या उत्कृष्ट वाचक पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे. यावर्षीचे उत्कृष्ट वाचक पुरस्कार बालगटातून शारदा अभ्यंकर व स्पृहा भावे यांना जाहीर झाले असून मोठ्या गटातून श्रीया पटवर्धन, नरेश पाडळकर यांना जाहीर झाले आहेत. या कार्यक्रमाला वाचक, सभासद, साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande