सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। पुरवठा विभागाने यंदा सोलापूरसह राज्यातील 19 जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे घेण्यात आला आहे.
राज्यातील अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत दरमहा अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्याचे वितरण केले जाते. अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ दिला जातो. तर प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ मिळतो. मागील तीन वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात शासनाकडून आनंदाचा शिधा म्हणून अतिरिक्त वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, या वर्षी तो रद्द करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड