सोलापूर : उर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश
सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसनमंत्र्यांकडुन दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिका
सोलापूर : उर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश


सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। नुकत्याच मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत फताटेवाडी येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसनमंत्र्यांकडुन दिलासादायक निर्णय देण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांना नोकरीत प्राधान्य देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील औष्णिक उर्जा प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख, अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी रोजगार, भरपाई, पुनर्वसन आणि स्थानिक विकासाशी संबंधित मुद्दे मांडण्यात आले. त्यावर सविस्तर चर्चा करून मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरीमध्ये प्रथम प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande