सोलापूर, 13 ऑक्टोबर (हिं.स.)बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या बुधवारी सोलापूर-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे, पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे. विमानसेवेचे बुकिंग 27 सप्टेंबरपासून सुरू झाले असून, पहिल्या पाच दिवसांसाठी तिकीट बुकिंग झाले आहे.
दरम्यान सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवेचा प्रारंभ मुंबई येथे होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड