अमरावती, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनधिकृत पॅथाॅलाॅजी लॅब धारकांचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असल्याने यात रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याच्या बातम्यांचे वृत प्रकाशित झाले होते. शहरात अनेक पॅथाॅलाॅजी लॅब आहेत सुत्रांच्या माहितीनुसार यातील काही परवानाधारक शासकीय नोकरीत तालुक्याच्या बाहेर ठिकाणी आपली सेवा बजावत असताना शहरातील पॅथाॅलाॅजी लॅबची कोणतीही पदवी नसलेला व्यक्ती खुले आमपणाने पॅथाॅलाॅजी लॅब चे रक्त, लघवी नमुना तपासणी चे रुग्णांचे रिपोर्ट देत आहे. हा रुग्णांच्या जिवाशी खेळ असून यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. जिवीत हानी झाल्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणा कारवाई करेल का असा प्रश्न प्रहार संघटनेचे उपतालुकाप्रमुख अरुण शेवाने यांनी केला आहे. देशात आतापर्यंत २३ मुलांचा मृत्यू कोल्ड्रिंफ कफ सिरप औषध मुळे झाला आहे योग्य वेळी या विषारी कोल्ड्रिंफ कफ सिरप औषध वर प्रशासनाने बंदी घातली असती तर निष्पाप २३ मुलांचा मृत्यू झाला नसता. एकीकडे केंद्र सरकार रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे व कमी खर्चात औषधी उपलब्ध करून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करत आहे. मात्र प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आरोग्य विषायातील गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करीत असल्याने नाहक रुग्णांना जिव गमावावे लागते असा आरोप आरोग्य यंत्रणेवर अरुण शेवाने यांनी केला आहे.अंजनगाव तालुक्यातील अनधिकृत पॅथाॅलाॅजी लॅब धारकांचा रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडला असून या अनधिकृत पॅथाॅलाॅजी लॅबची तपासणी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन देऊन शेवाने यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी