छत्रपती संभाजीनगर, 13 ऑक्टोबर (हिं.स.) : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू’ असे म्हणत टीकास्त्र सोडले आहे.
अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोणत्या योजना बंद केल्या याची यादीच शेअर केली आहे.
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.. शिंदेंच्या या योजना बंद..
१. आनंदाचा शिधा- बंद!
२. माझी सुंदर शाळा - बंद!
३. १ रुपयात पीकविमा - बंद!
४. स्वच्छता मॉनिटर - बंद!
५. १ राज्य १ गणवेश - बंद!
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!
७. योजनादूत योजना - बंद!
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू.
सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहका-यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले ‘कटप्रमुख’ मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील.
असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.राज्यातील गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदाने साजरे करता यावेत, यासाठी महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती. दिवाळीच्या तोंडावर ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ मिळण्याची आशा होती. परंतु, या योजनेसाठी निधीच नसल्याने शासकीय पातळीवर काहीच हालचाल झाली नसल्याची माहिती समोर आली.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis