परभणी, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।
श्री लक्ष्मी नरसिंह शुगर्स एल.एल.पी. चे आमडापूर येथील कारखान्यात आज गळीत हंगाम २०२५-२६ चा आठवा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन कारखान्याचे संचालक श्री प्रमोद जाधव व त्यांच्या पत्नी सौ. माधुरीताई जाधव, तसेच संचालक आ. डॉ. राहुल पाटील यांच्या पत्नी डॉ. संप्रियाताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मान्यवरांची होती.
ज्यात कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी कुलगुरू वेदप्रकाश पाटील व सौ. शांतादेवी पाटील, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक अॅड. नची जाधव व सौ. मुक्ताबाई जाधव यांचा समावेश होता.
संचालक प्रमोद जाधव यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दिवाळीच्या आगोदर बोनस त्यांच्या खात्यात जमा होईल, अशी आनंदाची घोषणा केली. मा. कुलगुरू श्री वेदप्रकाश पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन करत त्यांच्या मेहनत व समर्पणाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात आ. डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आर. पी. हॉस्पिटल, परभणी मध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात उपचार घेता येण्यासाठी आरोग्यपत्रिका वितरण करण्यात आल्या. यामुळे कर्मचाऱ्यांना आर. पी. हॉस्पिटलमध्ये अत्यंत अल्प दरात आवश्यक उपचार उपलब्ध होतील. तसेच डॉ. संप्रियाताई पाटील यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांशी आपुलकीने गप्पा मारून त्यांचे उत्साहवर्धन केले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी समर्थ गुरुमाऊली चंद्रकांतदादा मोरे उपस्थित राहिले व कारखान्याच्या यशस्वी वाटचालीस शुभाशीर्वाद दिले.
कार्यक्रमात रमेश जाधव, हनुमान शिंदे, श्रीराम गरुड, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुभाष सोलव, वर्क्स मॅनेजर संजय पांगरकर, प्रोसेस मॅनेजर शेवाळे, डिस्टलरी मॅनेजर गडकर, शेतकी अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis