बीड, 13 ऑक्टोबर (हिं.स.)।नवगण शिक्षण संस्था संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, चौसाळा येथे विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी केले तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या त्रिसूत्री संवादाचे महत्त्व. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी अधोरेखित केले. समाजघटकांनी शिक्षण क्षेत्राशी सातत्याने जोडलेले राहून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे कार्य सातत्याने होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमास बीड पंचायत समितीचे माजी सभापती काकासाहेब जोगदंड, नवगण शिक्षण संस्थेचे संचालक आमेर सिद्दीकी, अच्युत रसाळ, दादासाहेब तेलप, चंदन मिटकरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित खाकरे तसेच प्राध्यापक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis