ऊस पिकात एआयचा वापर वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये वापरण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणा
ऊस पिकात एआयचा वापर वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा महत्त्वपूर्ण निर्णय


पुणे, 13 ऑक्टोबर (हिं.स.) ऊस पिकात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून (व्हीएसआय) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये वापरण्यासाठी पाच हजार शेतकऱ्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विनामूल्य सहभागी होता येणार आहे.‘व्हीएसआय’मध्ये झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला.

ऊस शेतीमध्ये ‘एआय’चे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी आत्तापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला असून उर्वरित चार हजार १५० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.मात्र, नव्या निर्णयानुसार ‘व्हीएसआय’चा वाटा दुप्पट झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना आता कोणताही आर्थिक भार उरणार नाही. त्यामुळे आता ‘व्हीएसआय’ १८ हजार २५० रुपये प्रति हेक्टर देणार, तर साखर कारखाने सहा हजार ७५० रुपये भरतील. अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपयांचा खर्च पूर्णपणे भरला जाणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आदी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande